आरोग्य सेवा व रेशन व्यवस्थेविरोधात धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2013

आरोग्य सेवा व रेशन व्यवस्थेविरोधात धरणे आंदोलन


मुंबई : आरोग्य सेवा आणि रेशनच्या मागण्यांसाठी 'जन आरोग्य अभियान' आणि 'अन्न अधिकार अभियान' व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने आझाद मैदानात शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी जन आरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके, अन्न अधिकार अभियानाच्या उल्का महाजन, आ. धैर्यशील पाटील, आ. विवेक पाटील, सामाजिक कार्यकर्ते बंडू साने, अच्युत बोरगावकर उपस्थित होते. 

रेशनची रोख अनुदान योजना रद्द करावी, प्रभावी अन्न सुरक्षा कायदा त्वरित पारित करावा, १४ जीवनोपयोगी वस्तू रेशन दुकानात उपलब्ध कराव्यात, वर्षाला १२ अनुदानित गॅस सिलिंडर्स द्यावेत, एपीएल धारकास ३५ किलो धान्य द्यावे, किरकोळ व्यापारातील परदेशी कंपन्यांचे अतिक्रमण संपुष्टात आणावे, स्थानिक धान्य दुकानात उपलब्ध करावे, या व इतर मागण्या मंजूर कराव्यात. तसेच आरोग्य सेवेबाबतच्या मागण्यांबाबत बोलताना डॉ. अनंत फडके म्हणाले की, शासकीय डॉक्टरांनी खाजगी व्यवसाय करू नये, सरकारी दवाखान्यातल्या औषधांच्या तुटवड्यावर तामिळनाडू मॉडेल वापरावे, दवाखाने, हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणणार्‍या केंद्र सरकारच्या क्लिनिकला एस्टॅब्लिशमेंट अँक्ट २0१0 ऐवजी महाराष्ट्राचा सुधारित स्वतंत्र कायदा आणि सार्वजनिक आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करा व खाजगीकरण बंद करा, या मागण्या मंजूर कराव्यात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad