मुंबई : प्राध्यापकांच्या मागण्या रास्त असल्या तरी परीक्षेच्या काळात चालू ठेवलेले आंदोलन अयोग्य असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
ते आपल्या पत्रकात पुढे म्हणले की, प्राध्यापकांनी संपापूर्वी राज्य शासनाशी अनेकवेळा चर्चा केली होती. वास्तविक प्राध्यापकांच्या देण्यासाठी लागणारे १५00 कोटी रु. यूजीसी, केंद्र व राज्य सरकारने दिले असते तर हा प्रश्न संपापूर्वीच सुटला असता; परंतु राज्य शासनाने आश्वासनापलीकडे काही न केल्यामुळे प्राध्यापकांना संपाचा मार्ग अवलंबावा लागला. आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे प्राध्यापकांनी केलेला संप योग्यच होता; परंतु परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संप मागे घेणे आवश्यक होते. प्राध्यापकांनी घेतलेल्या अडेलतट्ट भूमिकेमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याला कोण जबाबदार? त्याला सरकारपेक्षा प्राध्यापकच जबाबदार असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. परीक्षा काळाचा विचार करून शासनाने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मार्ग काढायला हवा होता; परंतु शासनाला विद्यार्थ्यांची काळजी नसल्याचे मतही आठवले यांनी मांडले आहे. प्राध्यापकांनी संप आता मागे घ्यावा व परीक्षा झाल्यानंतर पुन्हा संप करावा.
No comments:
Post a Comment