मराठा आरक्षण संघर्ष समिती
मुंबई / अजेयकुमार जाधव
छत्रपती संभाजीराजे यांचा खरा इतिहास घरा घरात पोहचावा, त्यांची महती लोकांना कळावी या उद्देशाने ‘संभाजी १८६९’ हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे. संभाजीराजे यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला ‘संभाजी १८६९’ हा पहिलाच चित्रपट असून तो १७ मे रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. मात्र याच दिवशी यशराज फिल्म्सचा ‘औरंगजेब’ देखील प्रदर्शित होत असून या चित्रपटासाठी सर्व शो बुक केल्याने ‘संभाजी’ चित्रपटाला थियेटर मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. यामुळे या चित्रपटाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो आणि प्राइम टाइम’ दिला नाही तर थिएटर मालकांनी होणार्या नुकसानीला तयार राहावे, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे भूषण जाधव यांनी दिला आहे.
‘संभाजी १८६९’ हा चित्रपट ‘परफेक्ट प्लस एण्टरटेंनमेंट’च्या बॅनरखाली निर्माते राकेश एस. दुलगज यांनी तयार केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हा चित्रपट समर्पित करण्यात आला असून चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, असे चित्रपटाचे निर्माते राकेश दुलगज यांनी सांगितले. हा चित्रपट मराठी, हिंदी या भाषेत प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे तमिळ, तेलगु आणि इंग्रजी भाषेत डबिंग करण्याचे काम सुरु असल्याची माहिती दुलगज यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment