डॉ. आंबेडकर स्मारकासाठी एमएमआरडीए विशेष नियोजन प्राधिकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 March 2013

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी एमएमआरडीए विशेष नियोजन प्राधिकरण

मुंबई - मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण (स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी ही घोषणा केली. या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. कितीही पैसा लागला तरी तो उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सुभाष चव्हाण आणि इतर पाच सदस्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ""स्मारकासाठी आर्किटेक्‍ट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची कार्यवाही एमएमआरडीए करील. स्मारकाची जागा आरक्षित करण्यासंदर्भात बृहन्मुबई विकास योजनेतील फेरबदलाबाबत आलेल्या सूचनांचा विचार करून कार्यवाही करण्यात येईल. दादर चैत्यभूमी विकास आणि सौंदर्यीकरण यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. 

म. फुलेंच्या वारसांना नोकरी 
महात्मा जोतिबा फुले यांच्या दोन वारसांना नोकरी देण्यात आली असून, ते सेवेत रुजू झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका पुरवणी प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक त्यांनी पुण्यात सुरू केलेल्या भिडेवाडा या पहिल्या मुलींच्या शाळेत केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू असल्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सांगितले. हा प्रश्‍न अनिल भोसले यांनी उपस्थित केला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad