मुंबई : ऑलकॉर्गो लॉजिस्टिक्स या बहुराष्ट्रीय एकात्मिक लॉजिस्टिक्स कंपनीने आवश्य ग्रुप या आपल्या ब्रॅण्डअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यासाठी सायन येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल येथे मेडिकल सपोर्ट सेंटरचे उद््घाटन केले आहे. या केंद्राचा मूलभूत भर किफायतशीर, वेळेवर व दज्रेदार वैद्यकीय सेवा देण्यावर असणार आहे. पात्र रुग्णांसाठीचा तपासणी, शस्त्रक्रियाविषयक आणि वैद्यकीय खर्च ऑलकॉर्गो उचलणार आहे.
या केंद्राचे उद्द्याटन मेडिकल एज्युकेशनचे संचालक डॉ. सुहासिनी नागदा, ऑलकॉर्गो लॉजिस्टिक्सच्या कार्यकारी संचालक उमेश शेट्टी यांच्या हस्ते नुकतेच झाले. याप्रसंगी उमेश शेट्टी म्हणाले की, एक कंपनी म्हणून समाजामध्ये सकारात्मक योगदान देण्यासाठी आम्ही सर्मपित आहोत. मेडिकल सपोर्ट सेंटर (एमएससी) स्थापन करण्यासाठी सायन हॉस्पिटलसोबत सहयोग करताना आनंद होत आहे. लोकांना आरोग्यसेवा मिळण्यामध्ये येत असलेल्या उपलब्धता आणि किफायतशीरपणा या दोन प्रमुख आव्हानांवर मात करण्यासाठी एमएससी प्रय▪करणार आहे. समाजातील वंचित व मागास घटकांना एसएसएससीचा तातडीने लाभ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
Post Top Ad
26 March 2013
Home
Unlabelled
आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी कॉर्पोरेट क्षेत्राचा मदतीचा हात
आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी कॉर्पोरेट क्षेत्राचा मदतीचा हात
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment