'अर्थ अवर' उपक्रमामध्ये ७00१ शहरांतील लाखो लोक सहभागी होतात. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण व आधुनिक उपकरणांचा अधिकाधिक वापर यामुळे विजेची मागणी सर्वत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विजेची मागणी व पुरवठा यातील तफावत व पर्यायाने गैरसोयदेखील होत आहे. याकरिता विजेची बचत होण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी संस्थेच्या वतीने दि. २३ मार्च रोजी रात्री ८.३0 ते ९.३0 या वेळेत बहुसंख्य नागरिकांनी, व्यापार्यांनी, व्यावसायिकांनी विजेची उपकरणे बंद ठेवून 'पृथ्वी तास' या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
संस्थेच्या वतीने विभागात मेणबत्ती पदयात्रा काढण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष व पर्यावरण तज्ज्ञ संजय शिंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सौरऊज्रेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर अधिकाधिक करावा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपस्थितांना तसेच विभागातील जनतेला शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरणाच्या (महाऊर्जा) ऊज्रेचे प्रकार, पर्याय, ऊर्जा बचतीचे प्रकार इत्यादी विषयांच्या माहिती पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment