'आधार' नसले तरीही लाभ मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 March 2013

'आधार' नसले तरीही लाभ मिळणार

आधार कार्ड नसले तरीही राज्यातील कोणीही व्यक्ती अनुदान वा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून वंचित राहणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले. 

मुंबईतील २० हजार विद्यार्थी आधार कार्ड नसल्याने स्कॉलरशिपपासून वंचित राहणार या महाराष्ट्र टाइम्समधील वृत्ताची दखल घेऊन संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात २ लाख २९ हजार विद्यार्थी स्कॉलरशिपकरिता पात्र आहेत. त्यापैकी ५८ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी आधार करिता नोंदणी केली आहे. १ लाख ७० हजार ८२७ विद्यार्थ्यांनी ती करणे बाकी आहे. त्यापैकी २० हजार विद्यार्थी मुंबईतील आहेत असे दत्त म्हणाले. त्यावर उपसभापती वसंत डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad