आयडिया जलसा २४ मार्च रोजी रंगणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 March 2013

आयडिया जलसा २४ मार्च रोजी रंगणार

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील सगळ्यात मोठी मैफल म्हणून ओळखली जाणारी आयडिया जलसा - म्युझिक फॉर द सोल या कार्यक्रमाचे येत्या २४ मार्च रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ग्राऊंडवर संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. पार्श्‍वगायक शंकर महादेव आणि अंकिता जोशी या वेळी आपल्या गायनाने रसिकांचे मन रिझवणार आहेत.

प्रेक्षकांना भारतीय संगीताच्या वारशाचे जतन करण्यासाठी आणि विभिन्न संगीताचे प्रकार एका व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी आयडीया जलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १२ शहरातील सुमारे १00 कलाकारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे आयडीआय जलसाच्या निर्मात्या दुर्गा जसराज यांनी सांगितले. आपली संस्कृती समकालीन आणि सुसंगत पद्धतीने दाखविणे आणि संगीताशी तरुण पिढीला जोडणे आव्हानात्मक काम असल्याची प्रतिक्रिया दुर्गा जसराज यांनी दिली आहे.आयडीयाने नेहमीच संगीत आणि इतर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रय▪केला आहे. भारतीय संगीताच्या वेगवेगळ्या घराण्यांना मिळालेले सगळ्यात मोठे व्यासपीठ आयडीया जलसा आहे. इंडियन म्युझिक अँकॅडमीशी असलेल्या सहा वर्षांतील संबंधामुळे संगीताच्या विविध प्रकारचा एक भांडार निर्माण झाल्याचे आयडीया सेल्युलरचे मुंबई विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी एम. डी. प्रसाद यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad