मुंबई / jpnnews.webs.com
जीवनावश्यक वस्तुंवर करसवलती देत सर्वसामान्य जनतेला काहीसा दिलासा देणारा आणि सोने-चांदी, बिडी, सिगारेट, तंबाखू, देशी-विदेशी मद्य व बियर, लॉटरी यासारख्या गोष्टींवरील करात वाढ करणारा, १८४ कोटी ३८ लाख रुपये शिलकीचा, महाराष्ट्र राज्याचा २०१३-१४ या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत सादर केला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळ निवारणासाठी विशेष निधी उभारण्याची योजना या अर्थसंकल्पात असून त्यासाठी सोने-चांदी व त्यांचे दागिने तसेच उच्स खरेदी करात वाढ करण्यात आली आहे. राज्याची एकूण वार्षिक योजना ४६ हजार ९३८ कोटी रुपयांची असून स्थूल राज्य उत्पन्नात ७.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधान परिषदेत हा अर्थसंकल्प सादर केला.
२०१४ मध्ये येत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन अर्थसंकल्पात करसवलती देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी वर्षात राज्याचे महसूली उत्पन्न १ लाख ५५ हजार ९८६ कोटी ९५ लाख एवढे अपेक्षित असून महसूली खर्च १ लाख ५५ हजार ८०२ कोटी ५७ लाख रुपये एवढा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात १८४ कोटी ३८ लाखांची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. २०११-१२ या वर्षातील राज्याचे दरडोई उत्पन्न ९५ हजार ३३९ रुपये इतके असून दरडोई राष्ट्रीय उत्पन्न ६१ हजार ५६४ रुपये इतके आहे.
जीवनावश्यक वस्तू, सोलापूरी चादरी व टॉवेल, ओला खजूर या वस्तुंवरील करमाफी तसेच बेदाणे व मनुकांवरील करसवलत आणि चहावरील सवलतीचा ५ टक्के कर ३१ मार्च २०१४ पर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तुंमध्ये तांदूळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ, हळद, मिरची, चिंच, गूळ, नारळ, धणे, मेथी, पापड आदिंचा समावेश आहे. राईस ब्रान, हातपंप व वॉटर मीटर करमुक्त करण्यात आले असून हार्ट इम्प्लान्टवरील कर साडे बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. तसेच अंधांसाठीच्या ब्रेल घडयाळांवर व अपंगांच्या वाहनांवर मूल्यवर्धित कर माफ करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या दुधावर करमाफी देण्यात आली आहे.
दुष्काळ निवारणासाठी निधी उभा करण्याकरीता सोने-चांदी व त्यांच्या दागिन्यांवरील कर १ टक्क्यांवरून १.१० टक्के तसेच ऊस खरेदी कर ३ टक्क्यांवरून ५ टक्के असा वाढविण्यात आला आहे. मात्र हा कर एका वर्षासाठीच असून त्यातून सुमारे २ हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. तंबाखू सेवनास आळा बसावा या दृष्टिने सिगारेटवरील कर २० टक्क्यांवरून २५ टक्के तर बिडीवरील कर ५ टक्क्यांवरून साडेबारा टक्के करण्यात आला आहे. तसेच सर्व प्रकारच्या तंबाखुवर साडेबारा टक्के कर लावण्यात येणार आहे. सर्वप्रकारची सौंदर्य प्रसाधने व शॅम्पूवरील कर साडेबारा टक्के करण्यात आला आहे.

राज्याच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टये
* सन २०१२-१३ मध्ये स्थुल राज्य उत्पन्नात ७.१ टक्के वाढ अपेक्षित.
* सन २०११-१२ मध्ये दरडोई राज्य उत्पन्न ९५ हजार ३३९ रुपये.
* राज्याच्या वार्षिक योजनेचे आकारमान ४६ हजार ९३८ कोटी रुपये.
* अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ४ हजार ७८७ कोटी ६८ लाख रुपये.
* आदिवासी उपयोजनेसाठी ४ हजार १७७ कोटी ४८ लाख रुपये.
* जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी ५ हजार २०० कोटी रुपये.
* शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा ३४५ कोटी ७५ लाख रुपये.
* खतांच्या सुरक्षित साठयाकरिता ५३ कोटी ५० लाख रुपये.
* कृषि विकासाच्या विविध उपक्रमासाठी ७५१ कोटी ४ लाख रुपये.
* महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ७८७ कोटी ३९ लाख रुपये.
* जलसिंचन प्रकल्पांसाठी ७ हजार २४९ कोटी ७० लाख रुपये.
* महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत कालवे व वितरण प्रणाली पुनःस्थापन व धरणांची सुरक्षा ४००कोटी रुपये.
* पाणी टंचाईकरीता ८५० कोटी रुपये.
* चारा पुरवठयासाठी १८६ कोटी रुपये.
* राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून १०५० कोटी रुपये प्रस्तावित.
* औद्योगिक प्रोत्साहन अनुदानासाठी २५०० कोटी रुपये.
* यंत्रमाग धारकांच्या वीज दरात सवलतीसाठी ९३९ कोटी रुपये.
* औद्योगिक क्षेत्रास पूरक पायाभूत सुविधांसाठी १२३ कोटी ११ लाख रुपये.
* राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी ३२५ कोटी रुपये.
* आरोग्य संस्थांचा बृहत आराखडा व बांधाम ४७७ कोटी ९८ लाख रुपये.
* राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ५०० कोटी रुपये.
* सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियासाठी ७११ कोटी ५० लाख रुपये.
* मुलींच्या वसतीगृहांसाठी १०० कोटी रुपये.
* अनुदान प्राप्त खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेत्तर अनुदान २६६ कोटी ८२लाख रुपये.
* संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता ४५२ कोटी रुपये.
* विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी १९३ कोटी रुपये.
* राज्याच्या क्रिडा व युवक धोरणासाठी १५० कोटी ८३ लाख रुपये.
* दर्जेदार व कार्यक्षम अभियांत्रिकी शिक्षण पध्दतीसाठी ८० कोटी रुपये.
* राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमास २०० कोटी रुपये.
* ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता ६० कोटी रुपये.
* महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानाकरिता १४५ कोटी ४५ लाख रुपये.
* रस्ते विकासासाठी २ हजार ७१६ कोटी ६७ लाख रुपये.
* महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी १२० कोटी रुपये.
* रस्त्यांच्या चौपदरीकरणाकरीता वर्धनक्षमता तफावत निधी पोटी १७५ कोटी रुपये.
* प्रधानमंत्री ग्राम सडक योजना राय हिश्श्यापोटी ६४ कोटी रुपये.
* मिहान प्रकल्पासाठी २०० कोटी रुपये.
* पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाकरीता ३१७ कोटी १७ लाख
* राज्यातील कायदा सुव्यवस्था तसेच मुंबई, पुणे व इतर शहरांच्या सुरक्षेसाठी सीसी टिव्ही कॅमरे बसविण्याकरीता १४९ कोटी ७८ लाख रुपये.
* मागासक्षेत्र अनुदान योजनेकरीता ३०९ कोटी रुपये.
* ग्रामीण तिर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी रुपये.
* कोकण ग्रामीण पर्यटनासाठी ५० कोटी रुपये.
* पर्यटनाच्या पायाभूत सुविधा तसेच सिंधुदर्ग जिल्ह्यातील 'सी-वर्ल्ड' प्रकल्पाच्या भुसंपादनाकरीता २८५ कोटी रुपये.
* मराठी भाषा जतन, संवर्धन, दुर्मिळ ग्रथांचे ई-पुस्तक तयार करणे व मराठीसाठी युनिकोड आधारित टंकनिर्मितीकरीता १५ कोटी ६० लाख रुपये.
* ऐतिहासिक वारसा लाभलेली स्मारके तसेच वस्तुसंग्रहालये यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ३७ कोटी रुपये.
No comments:
Post a Comment