कोट्यवधी आंबेडकरी अनुयायांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असलेल्या चैत्यभूमीप्रमाणेच देशातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीवर टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक नाना शेंडे व विजय कुर्यवंशी यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री कपिल सिब्बल यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समस्त अनुयायांना नागपूर येथील दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा देऊन त्यांना एक नवीन जीवनमार्ग प्रशस्त केला. त्यांचे भविष्य उज्जवल करून परिवर्तनाचे व प्रबोधनाचे नवे दार सुरू केले. त्यामुळे या पवित्र दीक्षाभूमीला एक आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले व ऐतिहासिक मौलिकत्वसुद्धा मिळाले.
त्यादृष्टीने नागपूर शहराची नवीन ओळख संपूर्ण जगाला झाली आहे. या बाबीचे महत्त्व लक्षात घेता दीक्षाभूमीवर येत्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पवित्र पर्वावर टपाल तिकीट काढण्यात यावे, अशी मागणी ना. सिब्बल यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या १४ एप्रिल रोजी पवित्र चैत्यभूमीवर टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नाना शेंडे व विजय कुर्यवंशी यांनी ना. सिब्बल यांचे निवेदनाद्वारे अभिनंदनही केले आहे.
No comments:
Post a Comment