श्रीवर्धनच्या नायब तहसीलदारांना पंचवीस हजारांचा दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 March 2013

श्रीवर्धनच्या नायब तहसीलदारांना पंचवीस हजारांचा दंड


माहिती अधिकाराचे उल्लंघन केलेमुंबई - श्रीवर्धनचे नायब तहसीलदार व्ही. सी. गोसावी यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००७ या तरतुदीचे उल्लंघन केले. यामुळे सर्वात जास्त रकमेचा पंचवीस हजार रुपयांचा दंड राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी गोसावी यांना ठोठावला आहे
.
बागमांडले ता. श्रीवर्धन जि. रायगड येथील रहिवासी असून आदम मो. मांडलेकर यांनी त्यांच्या घराचे अनधिकृत बेकायदेशीर वाढीव बांधकाम केले होते. या विरोधात तहसीलदार श्रीवर्धन यांनी ६ जानेवारी २००७ रोजी त्यांना नोटीस बजावली.या नोटिसीविरोधात मांडलेकर यांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालय, अलिबाग येथे जिल्हाधिकारी, रायगड आणि तहसीलदार श्रीवर्धन यांच्याविरोधात दावा दाखल केला.

याप्रकरणात आवश्यक पक्षकार म्हणून सहभागी झालेले मांडलेकर यांच्या शेजारी रियाज डिमटिमकर यांनी न्यायालयाच्या आदेशान्वये वादग्रस्त बांधकामाबाबत कोणती कारवाई झाली याची तहसीलदार कार्यालयाकडून माहिती मागविली. ही माहिती मिळाली नाही म्हणून डिमटिमकर यांनी दुसरे अपिल केले. यासंदर्भात रियाज डिमटिमकर यांना वेळेत माहिती न पुरविल्यामुळे जनमाहिती अधिकारी आणि नायब तहसीलदार श्रीवर्धन व्ही. सी. गोसावी यांना त्यांनी माहिती देण्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष केले म्हणून २५ हजार रुपयांचा दंड ११ मार्च २०१३च्या आदेशानुसार राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी ठोठावला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad