पत्रकारांची फुकटची दिल्लीवारी…… - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 March 2013

पत्रकारांची फुकटची दिल्लीवारी……

अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com

रिपाइच्या रामदास आठवले यांचा १३ मार्च रोजी नवी दिल्ली येथे संसद भवनावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाच्या वृत्तसंकलनाठी मुंबई मधून १२ ते १५ पत्रकारांना खास तिकीट काढून विमानाने दिल्लीला नेण्यात आले होते. महाराष्ट्रामधील वृत्तपत्रांमध्ये या मोर्चाच्या बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात इतकाच याचा उद्देश होता. मुंबई मराठी पत्रकार संघ तसेच मुंबई महानगर पालिका मधील वृत्तसंकलन करणारे पत्रकार सतत आठवलेंच्या पत्रकार परिषदाच्या बातम्या आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करत असतात. यावेळीही या पत्रकारांनी भर उन्हामध्ये उपाशी पोटी रामदास आठवलेंच्या या मोर्चाचे चांगले वृत्त संकलन करून बातम्या आप आपल्या वृत्तपत्रांना बातम्या पाठवल्या या बातम्या १४ मार्चच्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध सुद्धा केल्या.

मोर्चाच्या निमित्ताने आठवलेंची क्वचित कधी तरी बातमी प्रसिद्ध करणारे काही मंत्रालय व मनोरंजन बीट वर काम करणारे ३- ४ पत्रकार दिल्ली फिरायला मिळते म्हणून सामील झाले होते. परंतू मंत्रालयाच्या तसेच एका वृत्तपत्राच्या मुंबई प्रमुख असलेल्या पत्रकाराने कोणतीही बातमी द्यायचे टाळून दिल्ली फिरण्यावरच भर दिला. मंत्रालायामधील एका पत्रकाराने इतका कहर केला एका पत्रकाराने लिहिलेली बातमी जशीच्या तशी आपल्या वृत्तपत्राला दिल्लीहून पाठवली. हा पत्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर फोन करून साहेबांची बातमी मी मुख्य पानावर लावून घेतली आहे असे सांगून हे लोकनायक आठवलेंच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीमध्ये १३ मार्चला आठवलेंचा मोर्चा नवी दिल्लीच्या जंतर मंतर वर चालू असताना या पत्रकारांनी खासदार संजय राउत यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या पत्रकारांना भेट दिली नाही. मग या पत्रकारांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळवला पवारांची भेट झाल्यावर पवारांनी या पत्रकारांना घरी जेवायला नेले असा दावा या पत्रकारांनी केला आहे. रात्री हे पत्रकार गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा भेटले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या सर्व प्रकारावरून हे पत्रकार दिल्लीला रामदास आठवलेंच्या पैशांवर आपली स्वताची कामे करायला आले होते का, आठवलेंच्या मोर्चाच्या बातम्या या पत्रकारांना प्रसिद्धच करायच्या नव्हत्या तर या पत्रकारांना आठवलेंनी कोणत्या कारणासाठी दिल्लीला नेले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad