कॉँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्याला राजकारणात भरपूर काही दिले आहे. शिवाय, सोलापूरकर आणि हुतात्म्यांच्या पुण्याईने पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात आली, ती आपण त्या-त्या वेळी निष्ठेने पार पाडली आहे. त्यामुळे लोकांनी जा म्हणेपर्यंत आपण राहू नये या मताचा मी आहे. त्यामुळे आगामी २0१४ सालची लोकसभेची निवडणूक आपण लढविणार नाही, असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमाप्रसंगी ना. शिंदे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, सोलापूरने देशाला एक कार्यकर्ता दिला. सोलापूरकरांच्या प्रेमामुळेच आपणास केंद्रातील मोठमोठी मंत्रीपदे मिळाली. इतकेच नव्हे, तर आतापर्यंत महाराष्ट्रातील कोणालाच जे पद मिळाले नाही ते लोकसभेचे नेतेपद मला मिळाले. ही सोलापूरच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे कॉँग्रेसने इतकी मोठी देशपातळीवर काम करण्याची संधी दिली असताना आता आपणास कोणत्याही पदाची अपेक्षा राहिली नसल्याने आणि राजकारणातील एक विशिष्ट र्मयादा पूर्ण झाली असल्याने आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Post Top Ad
04 March 2013
Home
Unlabelled
लोकसभा निवडणूक लढविणार नाही - शिंदे
लोकसभा निवडणूक लढविणार नाही - शिंदे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment