महिलादिनी शासन व पोलिसांकडून बौद्ध भिक्कुनिंचा अवमान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 March 2013

महिलादिनी शासन व पोलिसांकडून बौद्ध भिक्कुनिंचा अवमान


मुंबई / अजेयकुमार जाधव 
http://jpnnews.webs.com )
८ मार्च या जागतिक महिला दिनी बौद्ध भिक्कुनिना नागपूर येथून बोलवूनही त्यांचा योग्य सन्मान न केल्याने मुंबई पोलिस व महाराष्ट्र शासना विरोधात बौद्ध धर्मियात संतापाची लाट पसरली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अभिनेत्री हेमा मालिनी, प्रिती झिंटा, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या महिला दिनाच्या कार्यक्रमाला नागपूर येथून नऊ भिक्कुनींचा संघ बोलावण्यात आला होता. बौद्ध धर्मात भिक्षुंना महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही कार्यक्रमात कार्यक्रमात बौद्ध धम्म गुरु म्हणून भिक्षुंना धार्मिक रिती प्रमाणे त्यांचा सन्मान केला जातो. परंतू नागपूर येथून या भिक्कुनींना बोलावूनही त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात आलेले  नाही. त्यांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था केली नसल्याने त्यांना गेट वे ऑफ इंडियाच्या कठड्यावर बसावे लागले होते.

सदर प्रकार त्याच वेळी इंडियन स्टुडन्टस ऑर्गनायझेशन द्वारे महिलांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आयोजित मेणबत्ती मोर्चा मधील कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली व या महिला भिक्कुना आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. यावेळी या भिक्कुनी संघासोबत असलेल्या उपासिका अशोक पवार यांनी भिक्कुनिना कार्यक्रमात सहभागी करून घ्यायचेच नव्हते, या भिक्कुनिना आपले मत मांडायला द्यायचे नव्हते तर एवढ्या लांबून बोलावलेच कशाला असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तर इंडियन स्टुडन्टस ऑर्गनायझेशनने या प्रकाराबाबत महाराष्ट्र शासन व मुंबई पोलिसांचा निषेध केला आहे. झाल्या प्रकाराबाबत महाराष्ट्र शासनाने या भिक्कुनींची माफी मागावी तसेच या पुढील कोणत्याही कार्यक्रमात बौद्ध भिक्कुंचा योग्य सन्मान करावा अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad