मुंबई - मुंबई महापालिका झाडे कापण्याचा सपाटाच लावत आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या आज झालेल्या बैठकीत 688 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. 982 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वृक्ष प्राधिकरणाच्या कृपेने काही महिन्यांपासून झाडांची बेकायदा कत्तल सुरू आहे. पालिका कुलाबा येथे नवे मलनिस्सारण पंपिंग स्टेशन बांधणार आहे. यासाठी 994 झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणासमोर मांडण्यात आला होता; मात्र याला सर्व पक्षांच्या सदस्यांनी विरोध केल्याने त्यातील सुमारे 300 झाडांची कत्तल करून उर्वरित झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला; तसेच इतर ठिकाणची अशी 688 झाडे कापण्याचा निर्णय झाल्याचे सदस्य निरंजन शेट्टी यांनी सांगितले.
688 झाडे कापण्याबरोबरच 982 झाडांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. एक झाड कापल्यावर दोन झाडे लावावी लागतात, तसेच झाडांचे पुनर्रोपण शक्य असल्यास झाड कापण्याची परवानगी दिली जात नाही, हा केवळ एक बनाव असल्याचे आजवरच्या प्रकारामुळे उघड झाले आहे. झाडाच्या मोबदल्यात लावण्यात आलेली झाडे अल्पावधीत कोमेजून जातात, तसेच पुनर्रोपण करण्यात आलेली झाडेही जगत नाहीत. यामुळे मुंबई तब्बल एक हजार 670 झाडांना मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
No comments:
Post a Comment