मुंबई - मुंबईकरांना बेस्ट भाडेवाढीचा फटका येत्या 1 एप्रिलपासून पुन्हा बसणार आहे. "बेस्ट'च्या पहिल्या दोन टप्प्यांच्या भाड्यात एक रुपयाने वाढ होणार आहे. दोन किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे पाच रुपयांचे भाडे सहा रुपये; तर दुसऱ्या टप्प्याचे तीन किलोमीटरसाठीचे सात रुपयांचे भाडे आता आठ रुपये होणार आहे.
"बेस्ट'च्या या भाडेवाढीच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने गेल्या नोव्हेंबरमध्ये मंजुरी दिली आहे. "बेस्ट'च्या 2013-14 च्या अर्थसंकल्पात भाडेवाढ करण्याबाबतचा प्रस्ताव होता. अर्थसंकल्पाच्या मंजुरीबरोबर या भाडेवाढीला तेव्हाच मंजुरी मिळाली. या भाडेवाढीला कॉंग्रेसने विरोध केला होता. "बेस्ट'च्या अर्थसंकल्पाला स्थायी समिती, तसेच पालिकेच्या सभागृहाची मंजुरीदेखील मिळाली आहे. त्याच वेळी ही भाडेवाढही मंजूर झाली. बेस्ट सध्या आर्थिक संकटात असताना भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे मत बेस्ट समितीचे अध्यक्ष अशोक पाटील आणि "बेस्ट'चे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी व्यक्त केले होते.
"बेस्ट'चे पासही महाग झाले आहेत. मासिक पास 225 रुपये होता; तो आता 260 रुपये झाला आहे. 315 रुपयांचा मासिक पास आता 350 रुपये झाला आहे. मासिक आणि त्रैमासिक पासाच्या दरात सुमारे 20 ते 30 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment