रेल्वे मार्गाने पुणे गाठण्यासाठी हार्बर मार्गावरील विशेषत: नवी मुंबईतील प्रवाशांची होणारी गैरसोय आणि मुंबई-पुणे र्मगावरील वाढणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने कुर्ला ते शिवाजी नगरपर्यंत मेमू सुरू करण्याबाबत रेल्वे बोर्डाकडे आग्रही भूमिका घेतली आहे. ही मेमू सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाने परवानगी दिल्यास मार्च २0१४ पर्यंत ही मेमू धावणार आहे.
मुंबई-पुणे दरम्यान धावणार्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या फुल्ल असतात. त्यातच सर्व गाड्या मेन लाइन मार्गे जातात. परिणामी, हार्बर मार्गावर राहणार्या प्रवाशांना पुण्यासाठी ट्रेन गाठण्यासाठी दादर, ठाणे गाठावे लागते. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी डिझेल इंजिनवर चालणार्या मेमू चालवण्यात याव्यात, अशी भूमिका मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार, कुर्ला स्थानकावरून शिवाजी नगरसाठी मेमू सोडण्यात येणार आहे. त्याबाबत रेल्वे बोर्डाक डे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे मध्य रेल्ेवचे महाव्यवस्थापक
सुबोध जैन यांनी बुधवारी सांगितले. हा प्रस्ताव मान्य झाल्यास ही मेमू पनवेलमार्गे पुण्याला जाणार आहे.
५ स्थानके, १७0 कि.मी.
कुर्ला ते शिवाजी नगर हे अंतर सुमारे १७0 कि.मी. आहे. मेमू हे अंतर २ तास ५0 मिनिटांत पूर्ण करेल. त्यासाठी वाशी, बेलापूर, पनवेल, कर्जत, लोणावळा या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. मेमूमध्ये किमान १६ डबे असणार आहेत. रेल्वे बोर्डाने या सेवेस परवानगी दिल्यास प्रथम पनवेल यार्डाचे रिमॉडलिंग करण्यात येणार आहे. त्यास किमान ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे गाड्यांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.
No comments:
Post a Comment