शिवसेनाप्रमुखांचे स्मारक; महापालिकेकडून एक कोटींची तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 February 2013

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक; महापालिकेकडून एक कोटींची तरतूद

मुंबई  - शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचे सर्व प्रयत्न वाया गेल्यानंतर शिवसेनेने आता इतर ठिकाणी स्मारक उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने या वर्षीचा अर्थसंकल्प बुधवारी मंजूर केला. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आंतरराष्‍ट्रीय स्मारकासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 मुंबई महापालिकेचा 27 हजार 700 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारी रोजी महासभेत सादर झाला होता. गेले चार दिवस स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. बुधवारी झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात आली; परंतु त्या अर्थसंकल्पात सत्ताधारी युतीने 215 कोटी रुपयांची वाढ सुचवली असून  ठाकरे यांच्या आंतरराष्‍ट्रीय स्मारकासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

डॉ. आंबेडकरांचा मात्र विसर
डॉ.  आंबेडकरांच्या इंदू मिल स्मारकासाठी मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पालिकेने 1 लाखाची तरतूद केली होती. आता जमिनीबाबत  घोषणा झाल्यानंतर या तरतुदीत वाढ अपेक्षित होती. मात्र, यंदा पालिकेने तरतूद केली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad