महाराष्ट्रामध्ये मुले व मुली हरवण्याची संख्या वाढत असून इतर ग्रामीण विभागांच्या तुलनेत नागपूर, पूणे, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नवी मुंबई, अमरावती या शहरांमध्ये मुले व मुली मोठ्यासंख्येने हरवल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यांना गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य, पूणे यांनी दिलेल्या माहिती नुसार सन २०११ मध्ये ६२९५ मुले तर ८९६२ मुली हरविल्या होत्या त्यापैकी ५२०४ मुले व ७२६२ मुली मिळाल्या असल्याचे माहिती अधिकारात कळविले आहे.
सन २००९ मध्ये ५७८१ मुले व ७१११ मुली हरवल्या होत्या त्यापैकी ४९६८ मुले व ६२५२ मुली मिळाल्या आहेत. सन २०१० मध्ये ६५०१ मुले व ८१६५ मुली हरवल्या होत्या त्यापैकी ५६२२ मुले व ६९४५ मुली मिळाल्या असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने कळविले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीत महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये सन २००९ पेक्षा सन २०१० व २०११ मध्ये मुले व मुली हरवण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुले व मुली हरवण्याचे सर्वात कमी तक्रारी मुंबई, पूणे, नागपूर रेल्वेच्या हद्दीत असल्या तरी सन २००९ च्या तुलनेत २०११ मध्ये मुले व मुली हरवण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.
मुंबई रेल्वे मध्ये २००९ मध्ये ८ मुले व १८ मुली हरविल्या होत्या तर २०११ मध्ये १६ मुले व २६ मुली हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, पूणे रेल्वेच्या हद्दीत २००९ मध्ये २ मुले व २ मुली हरविल्या होत्या तर सन २०११ मध्ये ७ मुले व ३ मुली हरविल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment