मुंबई : युनायटेड, ओरिएंटल, नॅशनल, न्यू इंडिया या इन्शुरस कंपन्या एका छताखाली आणून त्यांची एकच कंपनी करावी. या कंपन्यामधील कामगारांचे पल्रंबित प्रश्न मार्गी लावावेत. या व आदी मागण्या घेऊन जनरल इन्शुरस एम्लॉयईज युनियनच्या वतीने गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली.
जगभरात विमा क्षेत्रामध्ये भरीव कार्य होत असताना भारतामध्ये या सेक्टरकडे गांभीर्याने पाहण्यास सरकार उत्सुक नाही. त्यामुळे सरकारने या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष भालचंद्र कांगो, सचिव ललीत सुवर्णा, यु. बॅनर्जी यांनी या वेळी केली. पेन्शनचा मोठा प्रश्न या क्षेत्रातील कर्मचार्यांचा आहे. त्याबाबत सरकारने वेळोवेळी आश्वासने दिली आहेत. त्याची पूर्तता त्वरित करावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भालचंद्र कांगो यांनी या वेळी दिला.
No comments:
Post a Comment