शिक्षण विभागातील चार हजार कर्मचारी सेवानवृत्तीनंतरच्या लाभापासून वंचित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 February 2013

शिक्षण विभागातील चार हजार कर्मचारी सेवानवृत्तीनंतरच्या लाभापासून वंचित

मुंबई : पालिकेतील प्राथमिक शिक्षण विभागातून गेल्या सात ते आठ वर्षांपासून आपल्या नियत वयोमानानुसार सेवानवृत्त झालेले सुमारे चार हजार कर्मचारी नवृत्तीनंतर मिळवणार्‍या सुविधांपासून वंचित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आपल्या हक्काच्या लाभापासून वंचित असलेल्या कर्मचार्‍यांना विना विलंब त्यांची देणी देण्याबाबत सर्व संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावेत, अशी लेखी मागणी शिक्षक सभेचे सरचिटणीस रमेश जोशी यांनी केली आहे. 

नवृत्तीनंतर आपली हक्काची देणी मिळावी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित शिक्षक, मुख्याधापक पालिका प्रशासन अधिकार्‍यांकडे उंबरठे झिझवत आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेचा आणि नाकर्त्या भूमिकेचा फटका त्यांना बसत आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांचे निवृत्तीनंतर मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. 

पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने २ जून २0१२ रोजी परिपत्रक काढून नवृत्त कर्मचार्‍यांचे वेतनदावे दाखल करण्यास दिरंगाई झाली, तर किंवा अधिकार्‍यांस विलंब झालातर त्याची गंभीरदखल घेण्यात येईल आणि दिरंगाई झाली तर संबंधित अधिकार्‍यास कडक कारवाई करण्यात येईल, असे खातेप्रमुखांनी कळवले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार रमेश जोशी यांनी उपायुक्तांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad