२० , २१ फेब्रुवारीच्या पुकारलेल्या ' भारत बंद ' मधून शरद राव यांच्या संघटनेने अंग काढून घेतल्याने मुंबईमध्ये संपाची धार बोथट झाली आहे. औद्योगिक क्षेत्र वगळता बस , रिक्षा , टॅक्सी आणि रेल्वेसेवा सुरळीत राहणार असल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला तरीही बँक कर्मचारी माघार घेण्यास तयार नसल्याने दोन दिवस बँक व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत.
भारतीय मजदूर संघ , इंटक , आयटक , सिटू ,एआयसीसीटीयू , गोदी कामगार संघटना , भारतीय कामगार सेना महासंघ , औद्योगिक कामगार , वीज कामगार , परिवहन कामगार , बँक-विमा कर्मचारी संघटना , केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी संघटना संपात सहभागी आहेत. तर , हिंद मजदूर सभा , बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघ , कॉलेज कर्मचारी युनियन , बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कस युनियन , महाराष्ट्र फार्मासिस्ट वेल्फेअर असोसिएशन ,शिक्षक भारती , महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कॉलेज संघटना , शिक्षक परिषद आणि संस्थाचालक संघटनेने संपातून माघार घेतली आहे.
No comments:
Post a Comment