साहित्य क्षेत्रात भूमिकेला महत्त्व -डॉ. कोत्तापल्ले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 February 2013

साहित्य क्षेत्रात भूमिकेला महत्त्व -डॉ. कोत्तापल्ले


साहित्य क्षेत्रामध्ये भूमिकेला महत्त्व असून भूमिका घेताना तुम्ही समाजातील मोठय़ा स्तराला सामावून घेणारी भूमिका घेता की वगळण्याची भूमिका घेता हेसुद्धा महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ठाण्यात केले. मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वतीने शनिवारी डॉ. कोत्तापल्ले यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते. 

अलीकडे जाती व्यवस्थेचे सर्मथन करणारे लेखन सुरू झाले असून, भारताच्या पराभवाच्या कारणांपैकी जातीभेद हे एक कारण असल्याचेही ते म्हणाले. साहित्य क्षेत्रामध्ये समाजाला पुढे नेणारी आणि उन्नत करणारी भूमिका घ्यायला हवी. भूमिकेशिवाय साहित्य पूर्णच होऊ शकत नाही, असे कोतापल्ले यांनी स्पष्ट केले.

आपली भूमिका अधिक विषद करताना त्यांनी सांगितले की, साहित्य संमेलन हे कोणत्याही विशिष्ठ जाती धर्माचे नाही, साहित्य संमेलनाला शासनाचे अनुदान मिळत असते आणि म्हणून हे संमेलन प्रस्थापितांचे आहे, तिथे जाता कामा नये असा विचार करणे चुकीचे असून तिथे गेल्याशिवाय संघर्ष करताच येणार नाही, अशी रोखठोख भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad