पालिकेत पशुकल्याण अधिकारी नेमण्याचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2013

पालिकेत पशुकल्याण अधिकारी नेमण्याचा निर्णय


मुंबई - भटक्या कुत्र्यांना न मारण्याचे कोर्टाने दिलेले निर्देश तसेच मुंबईबाहेर श्‍वानगृह बांधण्यास गावकर्‍यांचा होणारा विरोध यामुळे या कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. महापालिकेने या समस्येवर तोडगा म्हणून त्यांचे निर्बिजीकरण सुरू केले. मात्र यासाठी विशेष अधिकारी नसल्याने यातही अडथळे येत होते. आता महापालिकेने कुत्रे, घोडे आणि उंदरांच्या समस्येचे निवारण करण्यासाठी पशुकल्याण अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला असून याची घोषणा अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सभागृहात आज केली.

भटक्या कुत्र्यांच्या समस्या दूर करण्यासाठी या पशुकल्याण अधिकार्‍याकडून ऍक्शन प्लॅन आखला जाणार आहे. दररोज २२२ मुंबईकर भटक्या श्‍वानांच्या चाव्यामुळे जखमी होतात. या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणेही महापालिकेला कठीण जात आहे. त्यामुळे पालिकेने भटक्या कुत्र्यांसाठी श्‍वानगृह बांधण्याकरिता पालघरमध्ये जागा घेतली, मात्र स्थानिकांनी याला केलेल्या विरोधामुळे ही जागा महापालिकेला घेता न आल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी स्पष्ट केले. 
भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून त्यावर पालिका काय उपाय करते असा हरकतीचामुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांनी उपस्थित केला होता 

१०० दवाखान्यांत श्‍वानदंशाची लस उपलब्ध होणार
भटक्या श्‍वानांनी दंश केल्यामुळे पाच वर्षांत ६३ लाक रेबिजमुळे मृत्युमुखी पडले आहेत. रेबिज लससाठी २ ते ८ डि.सें. तापमान असणे आवश्यक असते. अशी सोय असलेले ४२ दवाखाने सध्या असून १०० दवाखान्यांमध्ये या लस उपलब्ध होतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad