मुंबई / अजेयकुमार जाधव
१९९१ पासून अनेक क्षेत्र खुली झाल्याने तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम सरकारला करता येवू शकत नाही असे स्पष्ट करत यापुढे सरकारी नोकऱ्या मिळणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी परिषदे दरम्यान दिले.
मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मंडळ यांच्या वतीने दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलताना महाराष्ट्रात शेतीचा १० टक्के, उद्योग धंद्यांचा २६ ते २७ टक्के तर सेवा क्षेत्राचा ६० ते ६२ टक्के वाटा आहे. यामुळे मराठी तरुणांनी सेवा क्षेत्राकडे वळून स्वतःचे उद्योग उभे करावे असा सल्ला मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिला. यापुढे सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण असून तरुणांना नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करावे लागेल, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल असे चव्हाण यांनी सांगितले. मराठी माणसांनी उद्योग उभारल्यास सरकार त्यांना संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. यावेळी उद्योग क्षेत्रात मराठी उद्योजकांनी केलेल्या भरीव कामगिरी बद्दल बांधकाम व्यावसायिक प्रकाश जोशी, सुश्रुषा रुग्णालयाचे संस्थापक पद्मभूषण डॉ. नंदकिशोर लाड, म्हाडाचे प्रसाद लाड यांचा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते उद्योग भूषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment