मुंबई / रशीद इनामदार - वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने १६,१७ आणि १८ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदान,सारसोळे डेपो,सेक्टर १२, नेरूळ नवी मुंबई येथे दुसऱ्या आखिल भारीत्य मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून गणेश नाईक हे संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत.
या साहित्य संमेलनाला वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ .सदानंद मोरे,संमेलनाध्यक्ष, प्रा.अभय टिळक (अर्थशास्त्रज्ञ), आमदार विवेकानंद पाटील, खासदार संजय पाटील, खासदार अनंत गीते, खासदार सुरेश टावरे, भास्कर जाधव, प्रमोद हिंदुराव, रामशेठ ठाकूर, नाना निकम .या मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यास राहणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता दिंडी सोहळ्याने सुरुवात होईल. यावेळी तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच ग्रंथ प्रदर्शन हि भरविण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment