मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक रुग्णालयात स्वतंत्र कक्ष असावा तसेच ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना घरी जाऊन तपासणी करून औषधोपचार करण्याकरिता फिरते रुग्णालय संकल्पनेच्या आधारे सेवा देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी अर्थसंकल्पावरील भाषणात केली. स्थायी समितीच्या बैठकीत २0१३-१४ च्या अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना चेतन कदम म्हणाले की, मनपाच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये मध्यमवर्गीय रुग्णांसाठी पैसे देऊन सेवा देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध असावे. प्रत्येक वर्षी आरोग्य सेवा जास्तीत जास्त सुधारित करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परंतु यंत्रणा वापरण्याकरिता पुरेसे टेक्निशियन, डॉक्टर्स, परिचारिका नाहीत. त्यामुळे सायन, नायर, केईएमसारखी वैद्यकीय कॉलेजे असणारी रुग्णालये उपनगरात व्हावीत, असेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतील उपनगरी मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांचा विचार करता प्रति पाच कि.मी. अंतरावर शौचालये असावीत, भिकारी व भटक्या विमुक्तांसाठी दोन तासांची फिरती शाळा असावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Post Top Ad
01 March 2013
Home
Unlabelled
ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
ज्येष्ठ नागरिकांसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment