गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची रिपब्लिकन पक्षाकडून मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2013

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची रिपब्लिकन पक्षाकडून मागणी

भंडारा जिल्ह्यातील लाखानी गावात तीन बहिणींवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जातीद्वेषातून झालेल्या या घटनेचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडून निषेध करण्यात येत आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्यासह पक्षातील कार्यकर्त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

खैरलांजी हत्याकांडाची ही पुनरावृती आहे. मुरबाडी (लाखानी) येथील ढवरेनगर भागात राहणार्‍या बौद्ध धर्मीय तीन बहिणींची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तीनही मुलींच्या शवविच्छेदनात त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. हे अमानुष कृत्य म्हणजे जातीयवादी षड्यंत्रांचा भाग आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

रिपाइंचे कार्यकर्ते मंत्रालयात घुसले
मुंबई : भंडारा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी करत रिपाइंचे कार्यकर्ते गुरुवारी सायंकाळी मंत्रालयात घुसले. मात्र पोलिसांनी त्यांचा प्रय▪हाणून पाडत १0 ते १२ जणांना ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांत राज्यात दलितांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. 'जागे व्हा, जागे व्हा, मुख्यमंत्री जागे व्हा' अशा घोषणा देत रिपब्लिकन नेते प्रा. रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मंत्रालयात घोषणा देत शिरले. भविष्यात असे प्रकार कायम राहिल्यास आठवले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गायकवाड यांनी या वेळी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad