राज्यात सामाजिक सलोखा कायम टिकविण्यासाठी ‘मोहल्ला कमिटी’च्या धर्तीवर ‘कम्युनिटी पोलिसिंग प्रयोग’ आणि ‘कामसुधार मंडळा’ची स्थापना करावी. महिनाभरात या शिफारसींचा विचार केला नाही तर राज्याचे पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना जाब विचारला जाईल, असा इशारा सुरेश खोपडे यांनी दिला. पोलीस दलाचे सक्षमीकरण व्हावे आणि राज्यातील धार्मिक व जातीय सलोखा कायम रहावा याकरिता गृहमंत्री आर.आर. पाटील, पोलीस महासंचालक आणि गृहसचिवांना शिफारसवजा आराखडा दिला आहे. त्याची सरकारने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही खोपडे यांनी केली.
यावेळी खोपडे यांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबबरोबरच्या भेटीचा अनुभव सांगितला. तुम्ही मुंबईवर हल्ला कसा काय करू शकलात, असा सवाल कसाबला विचारला असता त्याने हे तुमच्या इंटलिजन्सचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे नाकर्तेपण असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment