बंद पुकारणार्‍या पक्षांवर बंदी घाला! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 February 2013

बंद पुकारणार्‍या पक्षांवर बंदी घाला!

कोलकाता : बंदचे आवाहन करणार्‍या राजकीय पक्षांवर बंदी लादण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तृणमूल काँग्रेसला राज्यात कार्य संस्कृती निर्माण करण्यात यश आले आहे. याबाबतीत पश्चिम बंगाल देशात अव्वल क्रमांकावर आहे. जनतेने बंद फेटाळल्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करते, असे ममता बॅनर्जी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. कोलकात्यासह राज्यातील सर्वच शहरांतील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजारपेठा खुल्या आहेत. बहुतांश सरकारी कार्यालयांत 100 टक्के कर्मचारी उपस्थित आहेत. तर काही कार्यालयांत 97 ते 98 टक्के कर्मचारी हजर आहेत, असेही त्या म्हणाल्या. तृणमूल पक्ष केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात आहे. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्याचे या बंदमुळे मोठे नुकसान होणार असल्यामुळे आपली या बंदला परवानगी नाही, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या वेळी राज्यात या बंदचा अंशत: परिणाम झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता ममतांचा पारा चांगलाच चढला. तुम्ही कोणत्या समूहाचे आहात? तुम्ही एखाद्या खास माध्यम समूहाशी संबंधित आहात. त्यामुळेच तुम्ही अशाप्रकारचे प्रश्न विचारत आहात. कृपया तुम्ही बाजारपेठेत जाऊन पहा, असे त्या पत्रकारांना म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad