मुंबई : मनपाच्या दक्षता विभागात अधिकार्यांची कमतरता असल्यामुळे विकासकामे आणि इतर सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या कामांची छाननी योग्य प्रकारे होत नसल्याने त्यांची एकप्रकारे दिवाळीच होत असल्याचे दक्षता विभागाच्या शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या कार्यप्रणालीवरून निदर्शनास आले आहे.
रुग्णालये, यानगृहे, प्रयोगशाळा यामधील कंत्राटदारांच्या कामाच्या त्रुटी, दर्जा, इमारत बांधकाम, साहित्य चाचणी, विविध मशीनरी, विद्युत विभाग, शाळा, आरोग्य, घनकचरा,पर्यावरण या विभागाचे निरीक्षणाचे काम दक्षता विभागाच्या हाती असतो, मात्र कर्मचार्यामुळे कामाचा ताण आणि इतर बाबींमुळे दक्षता विभाग असमर्थ ठरत आहे. रस्ते, मलनि:सारण विभागात दोषी आढळलेल्या पाच ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांना कोणतेही काम न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या ठेकेदारांची लाचलुचप्रत विभागाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती दक्षता खात्याचे उपायुक्त (प्रभारी) एस.एम. शुल्का यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment