मुंबई : विक्रोळी वर्षा नगर ते घाटकोपरच्या भीम नगरपर्यंतच्या डोंगरावरील झोपडपट्टीवासीयांना २४ तास पाणी मिळावे. या मागणीसाठी स्वाभिमान संघटनेचे घाटकोपर तालुकाप्रमुख बबलू दुबे यांनी शुक्रवारपासून घाटकोपरच्या 'एल' वॉर्ड पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.विक्रोळी ते घाटकोपरदरम्यानच्या झोपडपट्टय़ांमध्ये सुमारे दोन ते अडीच लाख लोकवस्ती आहे.
या परिसरात पालिकेच्या २८ पाण्याच्या टाक्या आहेत; परंतु यातील केवळ दोन टाक्या पालिकेकडे असून उर्वरित २६ टाक्या या खाजगी विकासकांकडे आहे. या टाक्यांमधून डोंगरावर राहणार्या लोकांना पाणीच मिळत नाही. यासंदर्भात पालिकेच्या सर्व संबंधीत अधिकार्यांना तसेच मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहाराद्वारे तक्रारी केल्या; पंरतु कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे हे आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याची खंत बबलू दुबे यांनी व्यक्त केली. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून शुक्रवारपासून सुरू झालेल्या या उपोषणास विभागातील महिलांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता.
No comments:
Post a Comment