मुंबई :सफाई कामगारांच्या पल्रंबित मागण्यांबाबत शासनाने अद्यापपर्यंत गांभीर्याने भूमिका घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या, वेतनाच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी सफाई कामगार सेलच्या वतीने आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सेलचे मुंबई अध्यक्ष खेमचंद सोलंकी यांनी गुरुवारी पत्रकार संघ येथे दिली.
18 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पल्रंबित मागण्यांवर आश्वासन दिले गेले. मात्र त्याची अंमलबजावणी नाही. जातीचा दाखला अद्यापही अनेक कामगारांना मिळाला नसल्यामुळे त्यांना सरकारी लाभ मिळत नाही.कंत्राटी कामगारांच्याबाबतीत तर परिस्थिती भयावह आहे. कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यांना साफसफाई करतेवेळी योग्य सुरक्षा साधनांचा पुरवठा केला जात नाही. अनेक मृत कामगारांना अद्याप नुकसानभरपाई दिली जात नाही. त्यांच्या वारसांना नोकरी दिली गेली नाही. या पाश्र्वभूमीवर वेळप्रसंगी मुख्यमंर्त्यांची गाडी अडवण्याची वेळ या कामगारांवर आली तर आश्चर्य वाटायला नको, असे सोलंकी यांनी या वेळी सांगितले.
No comments:
Post a Comment