मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी घोटाळेबाज मनपा ठेकेदारांचा काळय़ा यादीत टाकले. हे केवळ मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाल्याचे मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी सांगितले. मुंबई पालिकेच्या मलनि:सारण विभागात 96 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्यामुळे पालिकेची मोठी बदनामी झाली होती. कंत्राटदारांनी जी कामे केली नव्हती त्या कामांचे खोटे कार्यादेश, देयके या कामांकरिता अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसताना अशाप्रकारे बोगस कामे दाखवण्यात आली होती. मात्र या प्रकरणात ठेकेदारांवर कारवाई न करता फक्त पालिका अधिकार्यांवरच कारवाई केली होती. मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे 96 कोटींचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आणि या प्रकरणातील 17 ठेकेदारांच्या सहभागाची चौकशीसह फौजदारी कारवाई करून काळय़ा यादीत टाकल्याची मागणी केली होती. या मागणीत तथ्य आढळल्यानंतर आयुक्तांनी चौकशी करून 5 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले. मात्र मे. चिराग कन्स्ट्रक्शन कंपनी, के. आर. कन्स्ट्रक्शन कंपनी, शांतीनाथ रोडवेज, आर. के. मधानी अँण्ड कंपनी, आर. पी. एस. इंफ्रा. प्रोजेक्ट्स प्रा. लि., महावीर इंफ्रा. प्रोजेक्ट प्रा. लि., स्कायवे इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपन्यांना काळ्या यादीत टाकले नसल्याचे सांगत या ठेकेदारांनाही काळ्या यादीत टाकण्याची मागणी लांडे यांनी केली आहे. |
Post Top Ad
08 February 2013
Home
Unlabelled
भ्रष्ट ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकण्याची मनसेची आयुक्तांकडे मागणी
भ्रष्ट ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकण्याची मनसेची आयुक्तांकडे मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment