वाहतूक समस्या सोडविण्यास जनतेनेही सहकार्य करावे - सहपोलीस आयुक्त फणसळकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 February 2013

वाहतूक समस्या सोडविण्यास जनतेनेही सहकार्य करावे - सहपोलीस आयुक्त फणसळकर



मुंबई : व्हीआयपींच्या सुरक्षेपेक्षा जास्त पोलीस बळ वाहतूक यंत्रणेत गुंतले आहे. अशा या वाहतूक समस्येसाठी वेळीच सावध होऊन सरकारबरोबर जनतेनेही हातात हात घालून काम केले, तरच वाहतूक समस्या संपेल, अन्यथा ती वाढतच राहील, असे स्पष्ट मत सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर यांनी पत्रकार संघ येथे व्यक्त केले.

आप्पा पेंडसे स्मृतिनिमित्त पत्रकार संघाने मुंबईतील 'वाहतूक समस्या' या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन केले होते. त्या वेळी परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे व फणसळकर उपस्थित होते. या वेळी बोलताना व्ही. एन. मोरे म्हणाले रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याचा अजून वापर वाढवत खाजगी वाहनांना इंधन, उपकर आदी कडक उपाययोजना आखत खाजगी वाहन घेणे नको, अशी अवस्था करून सोडली तरच नवीन वाहने मुंबईत येणार नाहीत व वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही. वाहने वाढली; पण वाहतूक क्षेत्र (जमीन) वाढली नाही. त्यामुळे पार्किगचा प्रश्न निर्माण होऊन तो वाढत आहे. वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे वाहने वाढत आहेत. इंधनावर उपकर लावले तर मुंबईत वाहने कमी येतील. 80 टक्के जमीन पार्किगसाठीच वापर होत आहे. घरात बसून काम केले तर कार्यालय व घर हा प्रवास वेळ वाचेल. सायकलचा वापर, चालत प्रवास आदी प्रकारे वाहतूक कमी करता येईल. रिक्षा, टॅक्सीसाठी आता तीन प्रकारचे सिंग्नल यंत्र त्या वाहनांवर बसवून खाली आहे, भाडे घेणार नाही, रिक्षा मोकळी नाही, असे लाल, पिवळे, हिरवे यंत्र बसवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे भाडे नाकारणे कमी होईल, असे मोरे म्हणाले. या वेळी विवेक फणसळकर म्हणाले मुंबईच्या समस्येत अग्रक्रमाने वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा मानला जातो. गेल्या 20 वर्षात 203 टक्के वाहन संख्या वाढलीय. मुंबईकरांनी वाहतूक पोलिसांबरोबर एक तास काम करून बघा त्यांना किती त्रास आहे. पत्रकारांनीसुद्धा वाहतूक पोलिसांच्या समस्या समजावून घ्याव्यात. फ्लायओव्हर झाल्यानंतरही वाहतूक समस्या सुटली नाही, मात्र नैराश्य हा कुठल्या समस्येवर उपाय नाही. समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आपण सर्वानी एकत्र काम करूया, असे फणसळकर म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad