मुंबई : सीमेवर प्राणपणाने देशाच्या शत्रूंविरोधात लढणार्या जवानांच्या कुटुंबीयांना गावात भीषण दहशतीचा सामना करावा का लागतो? जवानांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्रात संरक्षण मिळणार की नाही? असे व्यथित करणारे सवाल नगर जिल्ह्यातील सोनई येथील दलित हत्याकांडातील मृत संदीपच्या सैन्य दलातील भावाने उपस्थित केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) नेते अजरुन डांगळे, अविनाश महातेकर आदींसमवेत जवान पंकज थनवाल यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.मेहतर समाजातील तीन व्यक्तींची हत्या करण्यात आली होती.
जानेवारीत झालेल्या या हत्याकांडातील प्रत्येक मृताच्या नातलगांना दहा लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. थनवाल हे जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर कार्यरत होते.त्यांच्या भावाची हत्या करण्यात आली. तेव्हा पंकज हे सुट्टी घेऊन गावी परत आले. या हत्येचा तपास नीट होत नाही. दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली कारवाई व्हावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, असे ते म्हणाले. नगर जिल्ह्यातील सोनई आणि सातारा जिल्ह्यातील कुळकजाई येथील या दोन स्वतंत्र हत्याकांडाबाबत रिपब्लिकन नेत्यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याबरोबर चर्चा केली आणि याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
No comments:
Post a Comment