मुंबई : वृद्ध आई-वडिलांच्या आधारे बेस्टमधील कर्मचारी वसाहतीच्या सदनिकेत राहावयाचे आणि काही काळानंतर त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करावयाची, असा बेस्टच्या कर्मचार्यांचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या २७० बेस्ट कर्मचार्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
गोरेगाव, सांताक्रुझ, दिंडोशी, परळ, देवनार, अमृतनगर, पंतनगर, घाटकोपर इत्यादी ठिकाणी बेस्टच्या वसाहती आहेत. यापैकी १२३ कर्मचार्यांच्या आणि ५५ अधिकार्यांच्या वसाहती आहेत. बेस्टच्या दक्षता पथकाने नुकतीच या वसाहतींची पाहणी केली होती. त्या वेळी २७० कर्मचार्यांनी वृद्ध पालकांचे कारण पुढे करत घर घेतल्याचे आणि नंतर वृद्धांची रवानगी वृद्धाश्रमात केल्याचे आढळून आले आहे.आई-वडील आजारी असताना विशेष बाब म्हणून कर्मचार्यांना बेस्टच्या वसाहतीत राहण्यासाठी परवानगी देण्यात येते. मात्र याचा गैरफायदा घेणार्या या कर्मचार्यांना घर खाली करावे, अशी नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच पुढील कारवाईसाठी तयार राहावे, असे बेस्ट समिती अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले आहे.
No comments:
Post a Comment