अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाहीचा इशारा
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेमध्ये "डी" विभागात सफाई कर्मचारी असलेल्या सुनील यादव यांनी आपल्या हक्काची शिक्षणासाठी रजा मागितली असून यादव याला सात दिवसाच्या आत पालिका आयुक्त यांनी कारवाही न केल्यास अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाही करू असा सज्जड दम केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष राजकुमार वर्का यांनी सीताराम कुंटे व अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांना दिला आहे. सुनील यादव याला शैक्षणिक रजा दिली जात नसल्याचा प्रकार सर्वप्रथम दैनिक जनतेचा महानायक ने उघड केला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुनील यादव हे पालिकेमध्ये सफाई कर्मचारी असून आपली नोकरी सांभाळत टाटा संस्थेतून एम ए ग्लोबलायझेशन आणि लेबर स्टडी हा अभ्यासक्रम शिकत आहेत. सदर अभ्यासक्रम पूर्ण वेळ असल्याने यादव यांना शैक्षणिक सजा हवी होती. शैक्षणिक भरपगारी रजा मिळावी म्हणून यादव याने तसा अर्ज तत्कालीन पालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्याकडे केला होता.
पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सदर अर्ज अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्याकडे पाठवून पुढील कारवाही करण्यास सांगितले होते. परंतू गेले वर्षभर अडतानी या अर्जावर कारवाही करण्याचे टाळत " तू सफाई कर्मचारी है इतना लिख पडके क्या करेगा " असे म्हटले होते. पालिकेकडून आपल्याला नियम असूनही शैक्षणिक रजा दिली जात नसल्याने यादव याने केद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाद मागितली होती.
यानुसार अनुसूचित जाती जमाती आयोगा महाराष्ट्रामध्ये आला असता आयोगाचे उपाध्यक्ष राजकुमार वर्खा यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे व अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांना आयोगासमोर हजार राहण्यास सांगीतले होते. सोमवारी ११ फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनवाही करताना मोहन अडताणी यांना सज्जड दम देवून आयुक्त सिताराम कुंटे यांना यादव याची शैक्षणिक भरपगारी राजा मंजूर करण्यास सात दिवसाची मुदत दिली आहे. सात दिवसात कुंटे यांनी रजा मंजूर न केल्यास कुंटे व अडताणी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाही करण्यात येणार आहे.
अडताणीवर कारवाही करावी
==================
सुनील यादव प्रकरणी अडताणी यांनी जातीवादी भुमिक पार पाडली आहे. आज अडतानी सारख्या जाती वादी अधिकारयामुळे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना आयोगाकडून सज्जड दम दिला आहे. यामुळे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी तसेच राज्य सरकारने अडताणी यांच्यावर त्वरित कारवाही करावी तसेच त्यांच्या अखत्यारीत येणारा सामान्य प्रशासन विभाग काढून घ्यावा अशी मागणी सफाई कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे
No comments:
Post a Comment