मुंबई / अजेयकुमार जाधव http://jpnnews.webs. com
मुंबई महानगर पालिकेच्या डी विभागात सफाई कर्मचारी असलेल्या सुनील यादव यांना पालिकेने त्वरित रजा मंजूर न केल्यास अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार कारवाई करण्याची तंबी केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिली होती. या तंबी नंतर पालिकेने आज यादव यांना शैक्षणिक रजा मंजूर केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुनील यादव हे पालिकेच्या सफाई विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहेत. सफाईचे काम करताना शिक्षणाची आवड असलेल्या यादव यांनी टाटा सामाजिक संस्थे मधून एम. ए. ग्लोबलायझेशन आणि लेबर स्टडी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. सदर अभ्यासक्रम पूर्णवेळ असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी यादव यांना रजेची होती.
पालिकेच्या नियमाप्रमाणे यादव यांनी शैक्षणिक राजा मिळावी अशी विनंती पालिका प्रशासन व आयुक्त यांच्याकडे केली होती. परंतु सुनील यादव बौद्ध मागासवर्गीय असल्याने त्यांची हक्काची रजा देण्यास गेले वर्षभर टाळाटाळ करण्यात येत होती. यादव यांना अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी तर तू सफाई कर्मचारी है इतना पढ लिख कर क्या करेगा असे शब्द वापरले होते. याबाबत दैनिक जनतेचा महानायक मध्ये दृष्टीकोन सदरात प्रसिद्ध झालेला लेख व बातमी यामुळे यादव यांचे प्रकरण पालिकेत गाजू लागले होते.
यादव यांना शैक्षणिक रजा मंजूर करण्यासाठी पालिका दुर्लक्ष करत असल्याने केंद्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने या प्रकरणात घालून ११ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या सह्याद्री अतिथी गृह येथे सुनवाई घेवून रजा मजूर न केल्यास पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यानुसार कारवाही करण्याची तंबी दिली होती.
आयोगाने दिलेल्या तंबी नंतर पालिकेने यादव यांना बिनशर्त शैक्षणिक राजा मंजूर केली आहे. तसे पत्र पालिका प्रशासनाने यादव यांना दिले असल्याचे यादव यांनी दैनिक जनतेचा महानायकाला सांगितले आहे. यादव यांच्या लढाई मध्ये दैनिक जनतेचा महानायक ने दिलेल्या सहकार्याबद्दल सुनील यादव त्यांचे कुटुंबीय तसेच मित्रांनी महानायक चे आभार मानले आहेत.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा
पालिकेमधील मागासवर्गीय व सफाई कर्मचाऱ्याला शैक्षणिक रजा मंजूर करण्याबाबतची ऐतिहासिक लढाई यादव यांनी जिंकल्याने पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आता नोकरीवर असताना शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अडताणी यांच्यावर कारवाईची मागणी
यादव यांच्या प्रकरणावरून अडताणी यांच्या सारख्या अतिरिक्त आयुक्ताला जातिवाद करणे महाग पडले असून यादव यांची हक्काची रजा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अडताणी यांच्यावर पालिका व राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी मागासवर्गीय व सफाई कर्मचाऱ्यांनी दैनिक महानायकशी बोलताना केली आहे.
No comments:
Post a Comment