मुंबई - माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यात प्रवाशांसोबत सतत अपडेट राहण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उशिरा का होईना आता एक पाऊल पुढे टाकले आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी देशातील सर्व रेल्वे विभागांना फेसबुकवर स्वतंत्र खाते सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे फेसबुकवर खाते असणार्यांना रेल्वेच्या सर्व घडामोडींची माहिती मोबाईल व लॅपटॉपवर मिळणार आहे.
रेल्वेमंंत्री पवनकुमार बन्सल यांनी गेल्या आठवड्यात देशातील सर्वच महाव्यवस्थापकांना संबंधित विभागाचे फेसबुक सुरू करण्याची सूचना केली आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना केवळ मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व देशातील घडामोडींची माहिती फेसबुकवर उपलब्ध होणार आहे. यामध्ये उशिराने धावणार्या लोकल व मेल-एक्सप्रेस गाड्या, दरवाढ, वेळापत्रक, आरक्षणाची स्ंिथती, अपघात आदी घडामोडी प्रवाशांना फेसबुकवर उपलब्ध होणार आहेत. मध्य रेल्वे याअगोदरच ट्विटरवरून तर पश्चिम रेल्वे ’एम इंडिकेटर ऍप्स’द्वारे प्रवाशांशी जोडल्या गेल्या आहेत.
No comments:
Post a Comment