मुंबई : मनपा रुग्णालयात स्वाईन फ्लूची चाचणी करण्यासाठी येणार्या खाजगी रुग्णालयातील रुग्णांना आता दर आकारण्यात येणार आहे. यासाठी खाजगी रुग्णालयातील रुग्णांना चाचणीसाठी आता चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबईत गेल्या काही महिन्यात स्वाईन फ्लूने पुन्हा उचल खाली आहे. मुलुंड येथे स्वाईन फ्लूचे दोन रुग्ण आढळले होते. स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी पालिकेला कन्झ्युमेबल किट्स खरेदी करावे लागते. या किट्सची रक्कम वसूल होण्याच्या उद्देशाने चार हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी सांगितले. स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी औषध फवारणी आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे गवळी यांनी या वेळी सांगितले.
No comments:
Post a Comment