वाढीव मालमत्ता करास विरोध करू - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 February 2013

वाढीव मालमत्ता करास विरोध करू - महापौर


मुंबई : सध्या 500 चौरस फुटांपर्यंत निवासी घरांना मालमत्ता कर लागणार नसला तरी पाच वर्षानंतर त्यामध्ये 40 टक्के वाढ लागू होण्याची शक्यता आहे. पाच वर्षानंतरच्या कर सुधारणांच्या वेळीदेखील जे नवीन नियम व करांचे दर ठरवले जातील त्या वेळीही विरोध करू, अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गुरुवारी दिली. 1 एपिल्र 2010 पासून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. 2010 ते 2012 या वर्षाची बिले पाठवण्यात येत आहेत. त्यामध्ये घोळ आहे. घोळ दुरुस्त करून योग्य ती देयके मिळेपर्यंत प्रशासनाने नागरिकांवर कारवाई करू नये, अशी सूचनाही प्रभू यांनी प्रशासनाला केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad