पाशात्य धर्तीवरचे पहिले यकृत प्रत्यरोपण केंद्राचे उदघाटन रविवारी १७ फ्रेबृवारी रोजी मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात करण्यात आले.या कार्यक्रमात वैधकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर आणि लोक उपस्थित होते.यकृत प्रत्यरोपण केंद्राचे उदघाटन पदमश्री विजेते आणि विख्यात जठर आत्र सर्जन डॉ. तेहेम्तन उदवाडिया यांच्या हस्ते कॅनवेशन केद्रात झाले.
यावेळी अंबानी ग्रुपच्या टीना अंबानी यांनी सागिंतले कि, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय नेहमीच रुग्णांचे आरोग्य अबाधित राहवे यासाठी प्रयत्न करीत आहे.वैधकीय क्षेत्रातील नव्या सोयी सुविधा पुरविण्याचे काम करत आहे. नवी टेक्नोलोजी आणण्याचे काम करत आहे.रुग्णालयात यकृत प्रत्यरोपण केंद्र झाल्यामुळे निशितच लोकांना याचा फायदा होईल.यकृत निकामी झालेल्या लोकांना आता दूर कुठेही धावपळ करावी लांग्णार नाही.त्याची अधिकाधिक काळजी घेण्यात येईल आणि यकृत प्रत्यरोपण करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उदवाडिया यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षात मुंबईत किडनी विकाराने त्रस्त असलेल्या लोकांची संख्या जास्त आहे.त्यामुळे लोकांचा किडनी निकामी होवून मूत्यू होत असे. परंतु आता नवी टेक्नोलोजी आणि वैधकीय क्षेत्रात प्रगती झाल्याने त्याला रोख बसली आहे. त्यामुळे धीरूभाई अंबानी रुग्णालयातील अधानिक सोयीनी सुसज्ज असलेले यकृत प्रत्यरोपण केंद्राचा लोकाना जास्तीत जास्त फायदा होईल.
No comments:
Post a Comment