खारदांडातील झोपडीवासींचा आझाद मैदानात टमरेल मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 February 2013

खारदांडातील झोपडीवासींचा आझाद मैदानात टमरेल मोर्चा


मुंबई - खारदांडा, मधला पाडा येथील झोपडीवासींना शौचालय बांधून देण्यास आडकाठी करणाऱ्या "रिझवी बिल्डर्स'च्या दादागिरीविरोधात खारदांडा येथील साईकृपा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी (नियो.)तर्फे आज आझाद मैदानात "टमरेल' मोर्चा काढण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

महापालिका व रिझवी बिल्डर शौचालये बांधून देत नाही; झोपडीची डागडुजी करण्यास पालिका विरोध करते. त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय होते. याच्याविरोधात आज महापालिकेवर टमरेल मोर्चा काढण्यात आला. नरेश मोरे, संदीप मोरे, कॉवरेस डिसोजा यांच्यासह झोपडीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. "रिझवी बिल्डर्स'च्या दबावाखाली खार पोलिस रहिवाशांविरोधात खोटे गुन्हे नोंदवितात, असा आरोप त्यांनी या वेळी केला. 

येथील झोपडीवासीयांकडे 1995 पूर्वीची कागदपत्रे असून, 1979 मध्ये सरकारने ही जागा झोपडपट्टी म्हणून जाहीर केली होती. त्यानंतर रिझवी बिल्डरने 2005 मध्ये ही स्लम डीनोटिफाय करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या खटल्याचा 2006 मध्ये निकाल लागला; त्यात ही स्लम डीनोटिफाय करण्यात आली. त्याविरोधात नागरिकांनी 2007 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे असताना रिझवी बिल्डरने तेथे बांधकाम सुरू केल्याचा आरोप आंदोनलकर्त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad