मुंबई : पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे 30 किलो सोने गुप्तधन सरकारी प्रकल्पात सापडले आहे, मात्र अद्याप ते सरकारी तिजोरीत जमा नाही. पुनर्वसनामध्ये बोगस जमिनीचे वाटप प्रकरण, महावितरणाच्या भगीरथ योजनेची वीज चोरी या तीन मागण्या घेऊन तारापूरचे रहिवासी तानाजी कांबळे यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या प्रश्नी सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
सर्व कागदपत्रे गृहमंत्री, मानवधिकार, मंत्रालय, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आदी संबंधितांना रजिस्टर पोस्टाने व प्रत्यक्ष भेटून दिली आहेत, असे कांबळे यांनी या वेळी सांगितले. या प्रकरणी मी शांत बसावे म्हणून माझ्यावर खोटय़ा गुन्ह्याखाली तक्रारी करून अटक करण्यात आली होती. माझ्या आई-वडिलांनाही तुरुंगात डांबले होते. गुंडाकडून खुनाची धमकी दिली आहे. या सर्व प्रकरणी त्वरित न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा तानाजी कांबळे यांनी या वेळी दिला.
No comments:
Post a Comment