साहित्यिक नंदी यांच्याविरोधात आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 February 2013

साहित्यिक नंदी यांच्याविरोधात आंदोलन


मुंबई : साहित्यिक आशिष नंदी यांनी राजस्थान येथील जयपूर येथे सार्वजनिक कार्यक्रमात अनुसूचित जाती/जमाती व मागासवर्गीय समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने गुरुवारी आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले.आंबेडकरी विचार मोर्चाच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली आहेत. नागपूर येथे धरमदास रामाणी यांनी बाबासाहेबांच्या चार्त्यिावर शिंतोडे उडवल्याचे लिखित निवेदन स्वत:च्या सहीनिशी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवले. त्यामुळे रामाणी यांच्या विरोधात धरणे आंदोलन, मोर्चा, घेराव सुरू असून त्याची झळ मुंबई शहरात पोहचली आहे. अशा माथेफिरुला त्वरित अटक करून त्याला महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्यात यावी, असे संघटनेचे दिलीप कदम यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यात दलित सफाई कामगार तिहेरी हत्याकांडाची चौकशी करण्यात यावी या व आदी मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यभरातून शेकडो प्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपासारखा मोठा पक्ष धरमदास रामाणी यांचा जाहीर कार्यक्रमात सत्कार करते. हेसुद्धा योग्य नाही, असे दिलीप कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad