मुंबई : महाराष्ट्रातील पाच लाखांच्या पुढे संख्या असणार्या कागद, काच, पत्रा गोळ्या करणार्यांसाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर कल्याणकारी मंडळ बनवण्यासाठी मुख्यमंर्त्यांकडे आग्रही मागणी करणार, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ठोबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित क चरा कागद परिषदेच्या वेळी मंगळवारी दिले.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्योती म्हापसेकर, आकार संघटनेचे मिलिंद आरोंदेकर, स्त्रीमुक्ती संघटना, परिसर भगिनी विकास संघ, परिसर सखी विकास संस्था आदी संस्थांच्या वतीने मंगळवारी पत्रकार संघ येथे एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाबा आढाव म्हणाले, पुण्यामध्ये खाजगी संस्थेच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. त्यामुळे या कचरा वेचक घटकांवर त्याचा परिणाम झाला आहे.
कचरा मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. त्यांच्यासाठी कायदा बनवावा. कचरा वेचकांना निवृत्तीवेतन, आरोग्यलाभ, रजा, बाळंतपणाची रजा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, घराचा प्रश्न डम्पिंग ग्राऊंडवर स्वच्छ पिण्याचा पाण्याची सोय, सावली या व आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
No comments:
Post a Comment