मुंबई : मराठी मालिकांना चित्रनगरीत मिळणार्या सवलतीस मुदतवाढ मिळावी, या आणि इतर मागण्यांच्या मुद्दय़ांवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.
सध्या मराठी मालिकांना एका वर्षाची सवलत देण्यात येत आहे. मात्र ही सवलत पुरेशी नसल्याचे निर्माता आणि कलाकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती 2 वर्षापर्यंत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निर्मात्यांना वर्षभरासाठी आकारण्यात येणारे 54 लाख रुपयांचे शुल्क कमी करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. 'उंच माझा झोका' या मालिकेच्या निर्मात्यावर मालिका बंद करण्याची वेळ येणार आहे. अशा प्रकारे अनेक मालिका निर्मात्यांमध्ये शुल्क भरावे लागत असल्यामुळे नाराजीचा सूर उमटण्यास सुरूवात झाली आहे. अनुदानाचा प्रश्न, भाडय़ामध्ये सूट, शूटिंगच्या जागेबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली आहे. अ.भा.म.चित्रपट महामंडळाच्या कामातील बेकायदेशीरपणा, संचालक मंडळाच्या बैठकांना बगल देणे, निधीची उधळपट्टी या आणि इतर कारणांसाठी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली.
No comments:
Post a Comment