नायर रुग्णालयातील या कर्करोग उपचार केंद्रामुळे मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून गरीब मुंबईकरांनाही माफक दरात कर्करोगावर उपचार मिळणार आहेत. ही माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिनू संजाना यांनी दिली. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात ताण येतो. रुग्णांना तीन-तीन महिने उपचारासाठी ताटकळत राहावे लागते. मुंबईत शासनाचे एकही कर्करोग रुग्णालय नसून खाजगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार होणे अनेकांना अशक्य असते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मदतीसाठी सामाजिक संस्थांकडे फेर्या माराव्या लागतात. ही स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्वसामान्य रुग्णांना अल्पदरात नायर रुग्णालयात या केंद्रामार्फत उपचाराची सोय केली आहे. दरम्यान, नायर रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून कर्करोग रेडिओथेरपी विभाग सुरू होता. आता या ठिकाणी केमोथेरपी विभाग सुरू करण्यात येणार असून त्यास दोन कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी खाजगी तत्त्वावर तीन कर्करोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असून येथे दोन पाळ्यांमध्ये कर्करोग रुग्णांना अगदी माफक दरात उपचार दिले जाणार आहेत. केमोथेरपी उपचारासाठी ७५ खाटा असतील. या ठिकाणी १५0 रुग्णांवर रोज उपचार केले जाणार असल्याचे डॉ. संजाना यांनी सांगितले. या ठिकाणी केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्करोगाचे मोफत उपचार दिले जाणार आहेत.
मुंबई : कर्करोग रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात २ मार्चपासून कर्करोग औषधोपचार (केमोथेरपी) केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या हस्ते, महापौर सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत या केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
नायर रुग्णालयातील या कर्करोग उपचार केंद्रामुळे मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून गरीब मुंबईकरांनाही माफक दरात कर्करोगावर उपचार मिळणार आहेत. ही माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिनू संजाना यांनी दिली. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात ताण येतो. रुग्णांना तीन-तीन महिने उपचारासाठी ताटकळत राहावे लागते. मुंबईत शासनाचे एकही कर्करोग रुग्णालय नसून खाजगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार होणे अनेकांना अशक्य असते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मदतीसाठी सामाजिक संस्थांकडे फेर्या माराव्या लागतात. ही स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्वसामान्य रुग्णांना अल्पदरात नायर रुग्णालयात या केंद्रामार्फत उपचाराची सोय केली आहे. दरम्यान, नायर रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून कर्करोग रेडिओथेरपी विभाग सुरू होता. आता या ठिकाणी केमोथेरपी विभाग सुरू करण्यात येणार असून त्यास दोन कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी खाजगी तत्त्वावर तीन कर्करोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असून येथे दोन पाळ्यांमध्ये कर्करोग रुग्णांना अगदी माफक दरात उपचार दिले जाणार आहेत. केमोथेरपी उपचारासाठी ७५ खाटा असतील. या ठिकाणी १५0 रुग्णांवर रोज उपचार केले जाणार असल्याचे डॉ. संजाना यांनी सांगितले. या ठिकाणी केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्करोगाचे मोफत उपचार दिले जाणार आहेत.
नायर रुग्णालयातील या कर्करोग उपचार केंद्रामुळे मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून गरीब मुंबईकरांनाही माफक दरात कर्करोगावर उपचार मिळणार आहेत. ही माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मिनू संजाना यांनी दिली. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर मोठय़ा प्रमाणात ताण येतो. रुग्णांना तीन-तीन महिने उपचारासाठी ताटकळत राहावे लागते. मुंबईत शासनाचे एकही कर्करोग रुग्णालय नसून खाजगी रुग्णालयांमध्ये महागडे उपचार होणे अनेकांना अशक्य असते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मदतीसाठी सामाजिक संस्थांकडे फेर्या माराव्या लागतात. ही स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्वसामान्य रुग्णांना अल्पदरात नायर रुग्णालयात या केंद्रामार्फत उपचाराची सोय केली आहे. दरम्यान, नायर रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून कर्करोग रेडिओथेरपी विभाग सुरू होता. आता या ठिकाणी केमोथेरपी विभाग सुरू करण्यात येणार असून त्यास दोन कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. कर्करोग रुग्णांवर उपचारासाठी खाजगी तत्त्वावर तीन कर्करोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असून येथे दोन पाळ्यांमध्ये कर्करोग रुग्णांना अगदी माफक दरात उपचार दिले जाणार आहेत. केमोथेरपी उपचारासाठी ७५ खाटा असतील. या ठिकाणी १५0 रुग्णांवर रोज उपचार केले जाणार असल्याचे डॉ. संजाना यांनी सांगितले. या ठिकाणी केंद्र सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थींना कर्करोगाचे मोफत उपचार दिले जाणार आहेत.
No comments:
Post a Comment