..तर निवडणुकांवर झोपडीधारकांनी बहिष्कार टाकावा - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2013

..तर निवडणुकांवर झोपडीधारकांनी बहिष्कार टाकावा - आठवले

मुंबई : 2009 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या झोपडीधारकांच्या झोपडय़ांना मान्यता द्या; अन्यथा या झोपडीधारकांनी पुढील निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. दहिसर येथील चिंतामणी गार्डन येथे रिपाइंने आयोजित केलेल्या झोपडपट्टी बचाव परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आठवले बोलत होते.

सार्वजनिक प्रकल्पात बाधित होणार्‍या सर्व झोपडय़ांना पुनर्वसित केल्यानंरतच कारवाई करावी. शासनाने 2009 पर्यंतच्या झोपडय़ांना पात्र करावे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीयास दिलेल्या अन्न, वस्त्र आणि निवार्‍याचा हक्क हिरावून घेण्याचा हक्क कोणत्याही यंत्रणेस नाही. गोरगरीब झोपडीधारकांच्या पाठीशी रिपाइं मजबूत उभा राहील. त्यांना निवार्‍याचा हक्क मिळवून देण्यासाठी मुंबईत झोपडपट्टी बचाव आंदोलन उभारत असल्याचे या वेळी आठवले यांनी जाहीर केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad